Tuesday, April 26, 2016

एकेक आठवडा असा येतो की तो मध्यावर आलेला असताना लक्षात येतं सगळ्या ठरवलेल्या शेड्यूलच्या धज्जियां उडताहेत. एकही काम ठरवल्यानुसार होत नाहीये. रोजची कामंही मागे पडताहेत. अगदी रविवारचे पेपरही गुरुवारपर्यंत वाचून झालेले नसतात. ठरवलेल्यापैकी एकही कामाचा फोन झाला नाही, लिहून झालेलं नाही आणि आता ते अगदी गळ्याशी आलय. यामागे आपलीच चालढकल, भलत्याच गोष्टींमधे रमून जाणं, फ़ेसबुकवर रेंगाळणं, मित्रमैत्रीणीसोबतचा फ़ुकट टाईमपास, फोनवरची लांबलेली गॉसिप्स हे सगळं असल्याचं पक्कच ठाऊक असल्याने दोष कुणावर ढकलताही येत नसतो. 
सगळ्यात दारुण म्हणजे हे असे आठवडेच जास्त असतात याची जाणीव डायरीची मागची पानं उलटल्यावर लक्षात येणं. साधारण बुधवार-गुरवारच्या सगळ्याच एन्ट्र्या या अशा स्वत:ला कोसणा-या. 
कितीही टाईम मॅनेजमेन्टच्या टीप्स वाचा, डिक्लटरिंग, मिनिमलिझमचे कॉलम्स लिहा.. मनाला लगाम घालण्याची बाळबोध पुरातन शिकवण अंगी रुजत नाही तोवर सगळं व्यर्थ आहे. 

1 comment:

  1. 'मिनिमलिझमचे कॉलम्स लिहा..'
    च्यामारी! तुझा कॉलम वाचून मी कोनमारी केली माझ्या घरादाराची. आणि आता कबुल्या देतेस होय!

    ReplyDelete