आज संवेदने आठवण करुन दिली तेव्हा लक्षात आलं की कितीएक दिवसांमधे निरुद्देश, मनमोकळं, फ़क्त स्वत:करता असं लिहिलंच नाहीये. दिसामाजी लिहिणं होतंच असतं व्यवसायच लेखकाचा म्हटल्यावर. तरीही आत्यंतिक प्रेमातून लिहिणं फ़ारच वेगळं. लेखनातला मनमोकळा श्वास म्हणून तरी आता लिहायला पाहिजे असं.. रोजच्या जगण्यातलं, विस्कळीत, काहीही, बिनामहत्वाचं आणि स्वत:ला आवडलेलं.
कोणी वाचो, न वाचो..
आता याकरता नियमित वेळ काढणं आलं. जो मोकळा वेळ सध्या मिळतोय तो सगळ फ़ेसबुकवर फ़ालतू काहीतरी वाचण्यात जातोय.
खरय
फ़ेसबुकवरच्या फ़ुटकळ पोश्टींमुळे हे सगळं होतय.
च्यामारी त्या फ़ेसबुकच्या. सगळ्याची वाट लावलीय.. वेळेची, वाचनाची आणि लिहिण्याची.
तू स्वतन्त्र ब्लॉग काढलास, धाडसीच आहेस! पण आनंद आहे, लिहीती राहा
ReplyDeleteतू स्वतन्त्र ब्लॉग काढलास, धाडसीच आहेस! पण आनंद आहे, लिहीती राहा
ReplyDeleteकाढला कारण इलाजच नव्हता. माझे आधीचे ब्लॉग्ज माझ्या व्यावसायिक लेखांनी भरुन गेलेत. आता त्यांचा तो पॅटर्नच बनलाय म्हण ना. मग फ़ुटकळ काही लिहायला गेलं की तिथे ते चक्क हरवून जाणार.
ReplyDelete