जर्नलिंग-मॉर्निंग पेजेस-डायरी-ब्लॉगिंग काहीही म्हणा, पण पर्सनल रायटींग हे माझ्या दृष्टीने सेल्फ़-मॅनेजिंग, सेल्फ़-इम्प्रुविंग अशा अर्थाने कायम उपयोगी पडलेले आहे. मला ते रिलॅक्सिंग वाटते, डोक्यातला कोलाहल शांत होतो, आणि डॉर्मन्ट राहिलेल्या अनेक कल्पनांची बीजे तरतरुन वर येत रहातात लिहिताना.
सुरुवातीला मी
ऎक्टीविटी लॉग करायचे. म्हणजे किती वाजता उठले/लिहायला बसले/आज काय वाचलं/कोणाशी
बोलले/फ़िल्म्स कोणत्या पाहिल्या/सोशल मिडियावर नेमका किती वेळ घालवला किंवा काय
केलं? असं सगळं क्वान्टीफ़ाय. डेरियस फ़ोरोक्स ज्याच्याकडून मी तीन वर्षांपूर्वी
सेल्फ़-मॅनेजमेन्ट कौंन्सेलिंग घेतलं होतं त्याने मला काही बेसिक वाटणारे प्रश्न
दिले होते, ज्यांची उत्तरं मी रोज लिहिणं अपेक्षित होतं. सुरुवातीला मी इरिटेट
व्हायचे, याचा काय उपयोग असं वाटून. पण जसजशी मी रोज लिहायला लागले तसा मला
त्यामागचा एक्झॅक्ट मोटीव लक्षात आला. कारण त्यातल्या उत्तरांमधून माझा बराचसा
आळशीपणा, चालढकलेगिरी, कंटाळा उघडा पडायला लागला. प्रश्न असे होते-
- What time
did you wake up today?
- What was
the first thing you did?
- What did
you have for breakfast?
- How did
you feel during the morning?
- What did
you work on today? How did it go?
- What book
are you reading? What do you think about it?
शिवाय यातून एक महत्वाची
गोष्ट माझ्या लक्षात आली, की आपल्या मेमरीला तसा काही अर्थ नसतो. ठळक प्रसंग सोडले
तर फ़ार काही आपण दिवसभरातलं चोवीस तासांच्या वर लक्षात ठेवत नाही, ठेवू शकत नाही,
कारण सोशल मिडिया आणि आजूबाजूच्या वातावरणातून भरमसाठ डोक्यावर आदळत रहातं.
त्यामुळे या साध्या प्रश्नांच्या उत्तरांना काही ठराविक काळानंतर माझ्यापुरतं एक
महत्वाचं संदर्भमूल्य मला मिळत होतं. जयपूर लिटफ़ेस्टमधे मेम्वायर्सचं एक सेशन मी
अटेंड केलं होतं, त्यावेळी मधुर जाफ़रीचं मेम्वायर नुकतं पब्लिश झालं होतं. ती
सांगत होती- अनेक फ़ॅमिली एव्हेन्ट्स, ज्यात मी आणि माझी भावंड सामिल असायचो, उदा.
काही समारंभ, पिकनिक्स वगैरे, त्याबद्दलच्या आठवणी लिहिताना मी संदर्भ अचूक असावेत
म्हणून माझ्या भावाला किंवा मित्र-मैत्रिणींना विचारायचे, त्यांना काय आठवतय
याबद्दल म्हणून. एक प्रसंग होता, जेव्हा एका आमराईत आम्ही आमच्या घरच्या गाडीतून
सगळे गेलो होतो, सहा-सात भावंड. त्यावेळी माझा मोठा भाऊ आणि मी खूप भांडलो होतो,
त्याने मला गाडीतून ढकलून दिलं होतं आणि माझा हात मोडला होता. भावाला मी विचारलं
तेव्हा त्याला मुळात मी गाडीत होते सगळ्यांसोबत हेच आठवत नव्हतं. नंतर भांडण
दुस-याच एका भावाबरोबर झालं होतं असं तो म्हणाला. प्रत्येक भावाला गाडी कोणत्या
मेकची होती, तिचा त्यावेळी रंग काय होता, ड्राइव्ह कोण करत होतं याबद्दल वेगळ्या
स्मृती होत्या. थोडक्यात काय, आपल्या आठवणी आपल्याला हवं ते, हवं तसंच मेंदूत
साठवतात, कालांतराने त्यावर वेगवेगळे रंग, थर चढत जातात. आपल्या काही कटू
आठवणींकडे आपण वेगळ्या पर्स्पेक्टीवने बघू शकत होतो, त्याची गरज आहे हे आपल्या
लक्षातच येत नाही. त्यामुळे जे महत्वाचं आयुष्यात घडलं ते निदान वस्तुनिष्ठतेनं
नोंदवलं जायला हवं. जनरली हा ऎक्टीविटी लॉग मी रात्री लिहिते.
त्यानंतर मग- मॉर्निंग
पेजेस, आयडिया जर्नलिंग जे सकाळी, दिवसभरात केव्हाही करते. एडिट न करणे ही
मॉर्निंग जर्नलची मुख्य अट. स्ट्रीम ऑफ़ कॉन्शसनेस जर्नलिंग.
मला अनेकदा स्ट्रेस येत
रहातो, ऎन्क्झायटी सिन्ड्रोम दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशावेळी जर्नलिंग कमालीचे
उपयोगी पडते. लिहित जाताना अनेकदा स्ट्रेसचे कारण किती फ़ालतू आहे, त्यावर अमुक एक
करता येऊ शकतं, हे सुचत जातं. किंवा स्ट्रेस येण्यामागची काही लपलेली कारणं लक्षात
येत जातात. म्हणजे एखाद्या लेखाचा अचानक स्ट्रेस येतो, तेव्हा नुसती डेडलाईन
त्यामागचं कारण नाही, मुळात विषयच माझ्या आवडीचा नाही, किंवा त्याचा पुरेसा रिसर्च
झालेला नाही हे लक्षात येतं. ऑनलाईन वर्कशॉपचा स्ट्रेस आला, तेव्हा माध्यम नवं आहे
इतकंच त्यामागे नव्हतं, इंग्लिश किंवा मराठीतही फ़्लुएन्ट, प्रवाही संवाद साधणं
जमेल का याची चिंता होती.
“थिंक ऑन पेपर” हा
प्रकार एकंदरीतच मला जास्त सोपा आणि उपयोगी वाटतो.
एक महत्वाचं म्हणजे
जर्नलिंग ही फ़क्त टू डू लिस्टचा सविस्तर प्रकार नाही हे लक्षात ठेवणे- ही एक रिफ्लेक्टींग
ऎक्टीविटी आहे. त्यामुळे ते मी काय करायला हवं होतं, काय केलं यानी फ़ार क्लटर
करण्यात अर्थ नाही.
माझ्या हॅबिट ट्रॅकरमधे
जर्नलिंग इन्क्लुड केलं त्याचा नक्की फ़ायदा झाला. त्यामुळे अकाउंटेबिलिटी वाढली.
या ग्रूपवर लिहित रहाणे हेही माझ्या दृष्टीने मी ठरवलेल्या गोष्टींची
अकाउंटेबिलिटी तपासण्याकरता उपयोगी ठरले.
अर्नेस्ट हेमिंग्वेची एक बेस्ट रायटींग टीप आहे, पर्सनल जर्नलिंगच्या बाबतीत मी ती लक्षात ठेवते- “Write one true sentence.”
No comments:
Post a Comment